मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून मुंबईतल्या ३५ हजार आणि नागपूर इथल्या अडीच हजार गरजूंना धान्य वाटप केलं जात आहे.

अशा संकटाच्या काळात सर्वच लोकांनी गरजूंसाठी  पुढे आलं पाहिजे, जेणेकरून कोणीही उपाशी झोपणार नाही, असं मत शिवानंदन यांनी व्यक्त केलं.

मुंबई पोलिसांबरोबरच मुंबई रोटी बँक आणि अन्य ४५ स्वयंसेवी संस्था धारावी आणि इतर ठिकाणी खाद्य वाटप करत आहेत. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे वाटप केलं जात आहे.