नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या ३ मे नंतर लॉक डाउन टप्प्या टप्प्यानं कसा मागे घेता येईल, याबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
देशात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर प्रधानमंत्री तिसऱ्यांदा संवाद साधणार आहेत.