नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यांलयांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच निर्णय मिळाल्यानंतरच महाविद्यालयांच्या परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्ष, प्रवेश प्रक्रिया याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा अवधी दिला जाईल, असंही ते म्हणाले. मुंबईतले अनेक चाकरमानी कोकणात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत विचार केला जाईल, मात्र आंबा आणि मासळी वाहतुकीच्या गाड्यांमधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांविरुद्ध आणि वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.