पुणे : शासनाच्याी निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्यात पार्श्व भूमीवर 17 एप्रिल पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सोशल डिस्टेंसिंग ठेवून कामे सुरू करण्यात आली असून विभागात 987 कामे सुरू असून 3 हजार 955 मजूर काम करत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 61 हजार 35 कामांचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून सव्वा कोटी मजूर क्षमता निर्माण होवून शकते. त्यातून अनेक गरजूंच्या हाताला काम मिळू शकते असे सांगतानाच सोशल डिस्टेंसिंग महत्वाषमचे असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.