नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे.

प्रत्येक जण संसर्गापासून मुक्त राहिला तरच देश संसर्गापासून मुक्त होईल, असं जावडेकर यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे. या ॲपमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपण कोरोनाविषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, हे ॲप त्याबाबत आपल्याला सूचित करतं.