नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित आणि सर्व स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज जैव-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख/संचालक तसेच त्यांच्या 18 स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून संवाद साधला. मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत,

अँटी बॉडी निदान चाचण्यांच्या किट्स, RT-PCR निदान चाचण्या आणि कोविड19 ची लस विकसित करण्याच्या संशोधनाला गती द्यावी, असे हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि दिल्ली महानगरपालिका आयुक्त, पोलीस महासंचालक तसेच दिल्लीतील सर्व जिल्ह्यांचे अधिकारी आणि सरकारी रुग्णालयांचे प्रमुख या सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा केली. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

अत्यंत सौम्य लक्षणे असणे किंवा लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांच्या गृह अलगीकरणासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत; ज्यांच्या घरात गृह-अलगीकरणासाठीच्या पुरेशा सोयी आहेत, त्यांना घरातच स्वयं-अलगीकरणासाठी त्याचा वापर करता येईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  कोविड19 चे संशयित/पॉझिटिव्ह रुग्ण यांच्या योग्य व्यवस्थापनाबाबत 7 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना जोड म्हणून ही ताजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. ही सर्व मार्गदर्शक तत्वे आरोग्य मंत्रालयाच्या  खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesforHomeIsolationofverymildpresymptomaticCOVID19cases.pdf.

कोविड19साठी प्लाज्मा थेरपीसह  अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त उपचारपद्धती नाही असे ICMR ने याआधीच स्पष्ट केले आहे. सध्या आपण प्रयोगात्मक पातळीवर आहोत, त्यामुळे प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याबाबत कोणताही पुरावा सध्यातरी

आपल्याकडे नाही. या थेरपीचा प्रभाव तपासण्यासाठी  ICMR ने याआधीच राष्ट्रीय पातळीवर अध्ययन सुरु केले आहे. मात्र, जोपर्यंत ICMR चा हा अभ्यास संपून एक ठोस शास्त्रीय पुरावा आपल्या हाती येत नाही, तोवर हे उपचार केवळ संशोधन आणि चाचणीपुरतेच मर्यादित ठेवावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. किंबहुना, प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांमुळे कदाचित रुग्णाच्या आयुष्याला धोका निर्माण होईल, अशी गुंतागुंत होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच ICMR ने  प्लाझ्मा थेरपीच्या अध्ययनापलीकडील वापरासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

आजपर्यंत, देशातील 17 जिल्ह्यांमध्ये, जिथे आधी रुग्ण होते, तिथे गेल्या 28 दिवसात नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. या जिल्ह्यांच्या यादीत काल एका जिल्ह्याची भर पडली आहे ( दोन नव्या जिल्ह्यांची भर पडली आहे, मात्र जुन्या यादीतील एक जिल्हा कमी झाला आहे)   पश्चिम बंगालमधील कलीमपोंग आणि केरळमधील वायनाड हे जिल्हे समविष्ट झाले असून आधीच्या यादीतील लखीमसराय जिल्हा कमी झाला आहे.

आतापर्यंत देशातील 6,868 कोविडचे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 23.3% इतका आहे. आता देशातील कोविडच्या रुग्णांची एकूण संख्या 29,435 इतकी आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी :  https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी-  ncov2019@gov.in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free).

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf