मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या इस्कॉन मंदिरातर्फे अन्न वाटप केलं जात आहे. मुंबईतल्या जुहूच्या राधा रासबिहारी, गिरगावच्या राधा गोपीनाथ, मीरा रोडच्या राधा गिरधारी आणि नवी मुंबई खारघरच्या राधा मदनमोहन या चार इस्कॉन मंदिरांच्या माध्यमातून ३१ हजाराहून अधिक अत्यावश्यक सेवा देणारे  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, शासकीय रुग्णालये, पोलीस, बेस्ट यांच्यासोबतच गरीब, गरजू, मजूर, हातावर पोट असणारे कामगार, झोपडपट्टीवासीय यांना हे अन्न वाटप केलं जात आहे.