मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा अधिक प्रभाव असलेल्या मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ, लोअर परळ आणि करी रोड परिसरात पालिकेनं मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन सुरू केली आहे. याद्वारे डॉक्टर घराघरात जाऊन लोकांची तपासणी करत आहेत. तपासणीनुसार गोळ्या औषध देऊन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रूग्णात कोरोनासदृश्य लक्षणं दिसताच  त्याला रुग्णालयात दाखल केलं जात आहे.