नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आयकर दिवस आहे. भारतात पहिल्यांदा २४ जुलै १८६० मध्ये एका शुल्काच्या रुपातून आयकर घेण्यास सुरुवात झाली होती. आयकर पद्धतीला २४ जुलै २०१० मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून आजचा दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो. नागरिकांत करबाबत जागरुकता निर्माण व्हावी, त्यांनी वेळच्यावेळी कर भरून त्यांच कर्तव्य पूर्ण करावं यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. देशाला सक्षम करण्याच्या कामात नागरिक कर भरून त्यांचं योगदान देत असल्याबद्दल आयकर विभागानं त्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही आयकर विभागानं केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी नियमित कर भरून सरकारच्या कामाला गती देणाऱ्या नागरिकांचेही आभार मानले आहेत.