मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात चार बिबटे आढळले आहेत. बिबट्यांचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. वनविभागानं सुरक्षेच्या दृष्टीनं रात्रीची गस्त वाढवली असून दोन ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत.
सध्या विद्यापीठाचं कामकाज बंद असल्यानं विद्यार्थ्यांचा वावर आणि गर्दी कमी झाली असून बिबट्यांनी नजिकच्या जंगलातून विद्यापीठात प्रवेश केल्याचा अंदाज वडाळी इथले वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी दिली आहे.