नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्या-राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोय करावी, असा आदेश केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केला आहे. हे अडकलेले लोकं जिथं असतील तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं, आणि ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांनुसार त्यांना घरी किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.