मुंबई (वृत्तसंस्था) : आग प्रतिबंधक उपाययोजनांची पुर्तता न केल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेनं, शहरातल्या २० मॉल्सना जे – फॉर्म नोटीस पाठवली आहे.
अलिकडेच नागपाडा इथल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागल्याची घटना घडल्यानंतर, शहरातल्या सर्व मॉलच्या आग प्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी करायचे निर्देश पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते.
या तपासणीत २९ मॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांची पुर्तता केली नसल्याचं आढळलं. पालिकेनं आत्तापर्यंत ७५ मॉल्सची तपासणी केली आहे.