89% प्रश्नांचे निराकरण / तोडगा काढण्यात आला
मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख आणि आढाव्यामुळे निराकरण जलद व्हायला मदत झाली
दूरध्वनी क्रमांक 01123062487 आणि ईमेल- controlroom-dpiit@gov.in
नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) उद्योग आणि व्यापाराशी संबंधित समस्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि संबंधित राज्य सरकार, जिल्हा आणि पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांकडे या समस्या पोहचवण्यासाठी 26.3.2020 पासून एक नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. हा नियंत्रण कक्ष पुढील बाबींवर देखरेख ठेवतो-
-
अंतर्गत व्यापार ,उत्पादन, वितरण आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक यासंबंधी समस्या
-
लॉकडाऊन कालावधीत पुरवठा साखळीतील कोणत्याही समस्या सोडवण्यात विविध हितधारकांना येणाऱ्या अडचणी