नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य योग्य समन्वय साधत विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करतील असा विश्वास उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी व्यक्त केला आहे. मालवाहतूक कायम ठेवण्याच्या रेल्वेच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं आहे. यामुळे, शेतकऱ्यांना नाशवंत वस्तूंची वाहतूक वेळेत करायला मदतच होणार असल्याचं ते म्हणाले.

फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागल्याचे काही अहवाल येत असून राज्य सरकारं आणि जिल्हा प्रशासनांनी रेल्वेसेवांचा लाभ घेत शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं त्यांनी सांगितलं. याबाबत आपण गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती नायडू यांनी दिली.