नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या बाहेरून, मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी कामावर येणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय केली जाणार आहे.

या कर्मचाऱ्यांकरता कामाच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.