नवी दिल्‍ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कर्जदारांना येत असलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन ही विनंती केली आहे. यासंदर्भात काल या क्षेत्राचे आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक झाली.

सध्या रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँका तसंच बिगर बँकीग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांना लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना दिलेली कर्ज डिसेंबर २०२० पर्यंत एकदा पुनर्गठित करण्याची परवानगी दिली आहे. ही सर्व सर्वच कर्जदारांसाठी लागू करावी असं विनंती या बैठकीत करण्यात आली.