पुणे : साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्‍या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले.

साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍या पुणे व सोलापूर जिल्‍हा कार्यालयांकडून बिज भांडवल व अनुदान योजनेच्‍या 9 लाभार्थींना विविध व्‍यवसायांसाठी बँकांनी मंजुर केलेल्‍या एकुण 31 लाख 22 हजार रुपयांच्‍या अनुदानापैकी 6 लाख 4 हजार 471 एवढया रक्‍कमेचे धनादेश बांधकाम, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आले. पीएमआरडीए येथील आयोजित आढावा बैठकीनंतर धनादेश वितरणाचा कार्यक्रम संपन्‍न झाला.

यावेळी साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्‍यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे अध्‍यक्ष सदाशिव खाडे, प्रादेशिक व्‍यवस्‍थापक श्री. खुडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लाभार्थ्‍यांशी संवाद साधुन त्‍यांच्‍या इच्छित व्‍यवसायाच्‍या उभारणीबाबत चर्चा करुन त्‍यांना मार्गदर्शन केले. लाभार्थ्‍यांनी व्‍यवसायाच्‍या वृध्‍दी व वेळेत कर्जाची परत फेड करावी, असे आवाहन केले.