पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील जिवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज चालू करण्यासाठी प्रभाग स्तरावर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी प्राप्त करुन घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia. gov.in या वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. संबंधित व्यवसायिकांनी तो वेबसाईट द्वारे मिळवावा व संबंधित क्षेत्रिय कार्यालयात पुढील पुर्तता करावी. असे आवाहन शहाराच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

त्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रिय कार्यालयांचे अनुक्रमे

azone@pcmcindia.gov.in,

bzone@pcmcindia.gov.in,

czone@pcmcindia.gov.in,

dzone@pcmcindia.gov.in,

ezone@pcmcindia.gov.in,

fzone@pcmcindia.gov.in,

gzone@pcmcindia.gov.in,

hzone@pcmcindia.gov.in, हे ईमेल आयडी आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची एकल दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्रभाग स्तरावर प्रभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड मनपाच्या क्षेत्रातील सर्व व्यापारी संकूले, मॉल, मार्केट या संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. एकाच गल्लीत एकाच प्रकारच्या दुकानाकरीता अनेक अर्ज आल्यास त्यांना रोटेशन पद्धतीने परवानगी द्यावी असे निर्देश या समितीस देण्यात आले आहेत. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तच्या जास्तीत जास्त पाच दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रभाग स्तरावरील समितीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज असा प्राधान्यक्रम विचारात घेवून प्रभाग स्तरावर परवानगी देण्यात येईल.

पानटपरी किंवा चहाची टपरी यांना परवानगी देण्यात येणार नाही. सोशल डिस्टन्सींगचे व दिलेल्या नियमांचे पालन दुकानदार यांचेकडून न झाल्यास भारतीय दंडसंहिता कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. दुकाने सुरु करताना काय करावे व काय करु नये याबाबतच्या मार्गदर्शक सुचना मनपाच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर अर्जासोबत उपलब्ध आहेत.