नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी एका ट्विटव्दारे या प्रवाशांचं स्वागत केलं आहे.
या भारतीयांना देशातपरत आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल एअर इंडिया, नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसंच भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांचे जयशंकर यांनी आभार मानले आहेत.