नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या हीं सेवा देत आहेत.
आतापर्यंत या विमानसेवांच्या माध्यमातून ८४८ टन मालवाहतूक तर सुमारे ४ लाख ७३ हजार किलोमीटर हवाई प्रवास झाला आहे. हवाई वाहतूक मंत्रालय उडान विमान सेवा पुरवत असून जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारताच्या दुर्गम भागात पवन हंस आपली हेलिकॉप्टर सेवा पुरवत आहे.