नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं कृती दल करत असलेल्या कामाबद्दल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी प्रशंसा केली आहे.

हे कृतीदल कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये समन्वय आणि देखरेख ठेवण्याचं काम करत आहे. तसंच या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आत्तापर्यंत ३ हजारांहून अधिक कोरोना चाचण्याही केल्या आहेत. महाविद्यालयाचे संचारलक लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी या कृती दलाचं नेतृत्व करत आहेत.