पुणे : पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले आहेत. पुण्यात काल झालेल्या जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. मुलांच्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी लसीचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले. तसंच जिल्ह्यातील सभागृह आणि खुल्या मैदानातील कार्यक्रमांना २०० पेक्षा अधिक व्यक्तिंच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्याबाबत राज्यस्तरावर चर्चा करण्यात येणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं. शिवजयंती संबंधित कार्यक्रमांना परवानगी देण्यातबाबतही शासन स्तरावर चर्चा अपेक्षित असल्याचं ते म्हणाले.