नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या नाशिक जिल्ह्यात तसेच अन्यत्रही शेतकऱ्यांना अवघ्या पाच रूपये दराने बाजार समितीत कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतक-यांकडून थेट वीस रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने अभिनव ट्विटर आंदोलन सुरू केलं आहे.
राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांनी ट्विटरव्दारे प्रधानमंत्र्यांकडे मागणी करण्याच आवाहन संघटनेनं केलं असून या आंदोलनाला पहिल्याच दिवशी शेतक-यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असल्याचा दावा केला आहे.