नवी दिल्‍ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली आहे. मोबाइल फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा, चेक, चलान, पासबुक, कागद, लिफाफे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

डीआरयूव्हीएस कॅबिनेटमध्ये स्पर्श न करता स्वच्छता करता येते जे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खूप महत्वाचे आहे. ड्रॉवर ओपनिंग आणि क्लोजरिंग मॅकेनिझमसह सेन्सर स्विच त्याचे परिचालन स्वयंचलित आणि स्पर्शाशिवाय बनवते. हे कॅबिनेटमध्ये ठेवलेल्या वस्तूंना यूव्हीसीची  360 अंश इतकी उष्णता प्रदान करते. सॅनिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, सिस्टम स्लीप मोडमध्ये जाते, त्यामुळे ऑपरेटरला त्या वस्तूची प्रतीक्षा करण्याची किंवा त्याच्याजवळ उभे राहण्याची आवश्यकता नाही.

DRUVS Cabinet

आरसीआयने एक स्वयंचलित यूव्हीसी चलन सॅनिटायझिंग उपकरण देखील विकसित केले आहे, ज्याला नोट्सक्लिन म्हणतात. चलनी नोटांचे बंडल डीआरयूव्हीएस वापरुन स्वच्छ केले जाऊ शकते. परंतु प्रत्येक नोटेचे निर्जंतुकीकरण ही खूप वेळ घेणारी प्रक्रिया असेल. त्यासाठी, एक निर्जंतुकीकरण तंत्र विकसित केले आहे, जेथे उपकरणाच्या इनपुट स्लॉटवर फक्त सुट्या चलनी नोटा ठेवाव्या लागतात. ते एकेक करून नोटा घेतात आणि संपूर्ण निर्जंतुकीकरणासाठी त्यांना यूव्हीसी दिव्यांच्या  मालिकेतून  पुढे सरकवले जाते.

Automated UVC currency sanitising device NOTESCLEAN