नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परप्रांतीय मजूरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गावी जाण्यासाठी धारावीतील मजुरांची धावपळ सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी मजुरांची खाजगी दवाखान्यांबाहेर गर्दी उसळली आहे.

प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर २०० ते ३०० रुपये घेत असून या मजुरांची परवड थांबवावी, अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र कोरडे यांनी केली आहे.