नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मालासाठी रास्त भाव मिळावेत, यासाठी सरकारने ई-नाम मंच सुरु केला. देशभरातील 16 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशांच्या 585 घाऊक बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या आहेत. 30 जून 2019 पर्यंत 1.64 कोटींहून अधिक शेतकरी आणि 1.24 लाखांहून अधिक व्यापाऱ्यांनी ई-नाम मंचावर नोंदणी केली आहे. 30 जूनपर्यंत ई-नाम वर एकूण 71 हजार 69 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
देशात विविध राज्यांमधे वेगवेगळी व्यापार पोर्टल वापरली जातात. महाराष्ट्रात 2014 पासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधे संगणकीकृत लिलाव प्रणाली (सीएएस) राबवली जाते.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.