नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ७२२ नवे रुग्ण देशभरात काल आढळले तर १३४ जणांचा काल या आजारानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ हजार ५४९ जणांचा बळी कोविड १९ मुळे गेला आहे. मात्र यातल्या ७०% रुग्णांना इतर गंभीर आजार होते.
देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७८ हजार ३ झाली असून ४९ हजार २१९ जणांवर उपचार सुरु आहेत तर २६ हजार २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३३ पूर्णांक ६३ शतांश टक्के झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.
राज्यात काल आणखी एक हजार ४९५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २५ हजार ९२२ झाला आहे. काल या आजारानं राज्यात ५४ जणांचा मृत्यू झाला, त्यात मुंबईतले ४० रुग्ण आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४२२ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पाच हजार ५४७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
राज्यात ५५ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यात १२८९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सातवर गेलेला मृत्यूदर ३.७ पर्यंत आटोक्यात आणण्यात आला. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.