नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली आहे.

या परीक्षण संचाची कार्यक्षमता ९८ पूर्णांक सात दशांश टक्के एवढी असून, या संचाद्वारे अडीच तासात कोरोना विषाणू संसर्गाच्या ९० नमुन्यांचं परीक्षण करता येतं.

जिल्हा पातळीवरही या संचामुळे विषाणू संसर्ग परीक्षण करता येणं शक्य होणार असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.