नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती आणखी बिघडू शकते.

त्यादृष्टीने कोविड-१९ रुग्णालयांमधली व्यवस्था येत्या ऑगस्टपर्यंत कायम ठेवावी असं कृतीदलानं सरकारला सुचवलं आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ११ दिवस आहे तो २० पर्यंत जायला हवा असं ते म्हणाले.