पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील शासन आदेश दिनांक 11 डिसेंबर 2019 अन्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. त्यागी यांनी दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

तसेच डॉ. त्यागी यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. विवेक खांडेकर, भा. व. से., मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आलेला आहे.