नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ आजारानं देशात आतापर्यंत २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १०३ रुग्ण मरण पावले तर ३ हजार ९७० नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९४० झाली असून ५३ हजार ३५ रुग्ण उपचार घेत आहेत तर ३० हजार १५२ पूर्णपणे बरे झाले आहेत.
रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ३५ पूर्णांक ८ शतांश टक्के झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. मरण पावलेल्या ७०% रुग्णांना इतर गंभीर आजार होते.
राज्यात काल आणखी एक हजार ५७६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २९ हजार १०० झाला आहे. या आजारानं काल राज्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात एक हजार ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
काल दिवसभरात राज्यभरातल्या ५०५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सहा हजार ५६४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. मुंबईत काल कोरोनाचे ९३३ नवे रुग्ण आढळले तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईतली एकूण रुग्णसंख्या १७ हजार ५१२ झाली असून ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ हजार ५६८ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात सध्या २ हजार ६४६ विलगीकरण केंद्र उपलब्ध असून रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं विलगीकरणासाठी जागा कमी पडू नये याकरता महानगरपालिका वानखेडे स्टेडीयमचा ताबा घेणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून २७ टक्क्यांवर पोचलं आहे. जिल्ह्यात काल ७ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २७३ जण कोरोनामुक्त झाले आहे.
पालघर जिल्ह्यात काल १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३२८वर पोचली आहे, तर आत्तापर्यंत या आजारानं १६ जण दगावले आहेत.
जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक २८९ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातले १७३ कोरोनारुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्या १ हजारांहून अधिक झाली.
तिथे काल ७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्ण संख्या १ हजार ४८ झाली आहे. काल ४ रूग्णांचाही मृत्यू झाला. सध्या नवी मुंबईतल्या ७५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १५, पनवेल ग्रामीण भागात १२, उरणमधे ३, तर अलिबाग आणि मुरूडमधे प्रत्येकी १ अशा ३२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, यामुळे तिथली एकूण रूग्णसंख्या ४५९ झाली आहे.
तिथे काल दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात खालापूर आणि मुरुड तालुक्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं दगावलेल्यांची संख्या १७ झाली आहे. आतापर्यंत एकूण १३१ रूग्णांना ते कोरोनामुक्त झाल्यानं रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
जळगाव जिल्ह्यात काल जळगाव शहर, अमळनेर आणि पाचोऱ्यात प्रत्येकी १ असे ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. त्यापैकी ३५ रुग्णांना कोरनामुक्त झाल्यानंतर घरी सोडलंय तर आत्तापर्यंत २८ जण या आजारानं दगावले आहेत.
दरम्यान जिल्ह्यातला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, तर तर तालुकास्तरावरच्या कोविड-19 केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलटे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांची नियुक्ती केली आहे.
परभणी जिल्ह्यात काल ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर आणखी १९ संशयित रुग्णही दाखल झाले आहेत. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी नांदेड इथं पाठवले आहेत.
अहमदनगर इथं काल दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. अमरावतीत काल आणखी चार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ९४वर पोचली आहे. यांपैकी आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या ५६ जणांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
साताऱ्यातही काल ३ नवे तर आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. यांपैकी एक जण जिल्ह्यात विनापरवानगी आला होता. आता जिल्ह्यातली एकूण कोरनाबाधितांची संख्या १२९ झाली असून, यांपैकी २ जण दगावले आहेत, तर ६१ जणांना ते बरे झाल्यानं रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल उपचारानंतर निगेटीव्ह आल्यानं, त्याला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यातल्या तीन रुग्णांपैकी एकाचा याआधी मृत्यू झाला होता, तर सध्या मुंबईतून गावी आलेल्या आणि नंतर कोरोनाबाधित आढलेल्या एका महिलेवर उपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्हा न्यायालयात कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर काल एक विशेष मोहीम राबवण्यात आली. यामधे न्यायिक अधिकारी, न्यायालय कर्मचारी, विधिज्ञ, सरकारी अधिकारी, पोलिस शिपाई यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयानं सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम तीस या होमिओपॅथिक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं.
जालना जिल्ह्यात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज सकाळी स्पष्ट झालं आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह मंठा तालुक्यातल्या पेवा इथल्या एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. बाधित महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतल्यानंतर तिला मंठा इथल्या कोवीड रुग्णालयात ठेवण्यात आलं आलं होतं.
जालना जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता २५ झाली असून कोरोना विषाणू मुक्त झालेल्या सात रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली आहे. सोलापूरमध्ये आज कोरोना विषाणूचे १७ नवे रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी १४८ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी १७ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
यामध्ये दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. सोलापूरमधील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता ३६० झाली आहे.
पालघर जिल्ह्यात काल १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३२८वर पोचली आहे, तर आत्तापर्यंत या आजारानं १६ जण दगावले आहेत. जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक २८९ रुग्ण आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यातले १७३ कोरोनारुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्या १ हजारांहून अधिक झाली. तिथे काल ७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्ण संख्या १ हजार ४८ झाली आहे.
काल ४ रूग्णांचाही मृत्यू झाला. सध्या नवी मुंबईतल्या ७५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १५, पनवेल ग्रामीण भागात १२, उरणमधे ३, तर अलिबाग आणि मुरूडमधे प्रत्येकी १ अशा ३२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, यामुळे तिथली एकूण रूग्णसंख्या ४५९ झाली आहे.
तिथे काल दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात खालापूर आणि मुरुड तालुक्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं दगावलेल्यांची संख्या १७ झाली आहे. आतापर्यंत एकूण १३१ रूग्णांना ते कोरोनामुक्त झाल्यानं रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
धुळ्यात काल एकाच दिवशी ४ जण कोरोना मुक्त झाल्यानंतर आज भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या एका डॉक्टरांनी कोरोना विषाणुच्या संक्रमणापासून मुक्ती मिळवली आहे. रुग्णालयातल्या एका डॉक्टरांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यावर आठवडा भराच्या यशस्वी उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना कोरोनामुक्त जाहिर केलं आहे.
धुळ्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे. दरम्यान, धुळे शहरात व्यापार्यांूना व्यवसाय सरु करायची परवानगी ठराविक नियम आणि शर्तीच्या आधारावर द्यावी, अशी मागणी धुळे व्यापारी महासंघाने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिलं आहे. बीड जिल्ह्यालगतच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात कोविड-१९ विषाणूचे ०३ बाधीत रुग्ण आढळून आले. त्यामुळे लगेचच बीड जिल्हा प्रशासनानं या केज आणि कळंब परिसरातली सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा,भोपळा, हादगाव ,सुर्डी आणि बोरगांव ही गावं बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या संदर्भात आज आदेश जारी केला. ही सर्व गावं अनिश्चित कालावधीसाठी बंद करून इथं संचारबंदी लागू केल्याची माहिती रेखावार यांनी दिली आहे. अमरावती इथं आज आणखी पाच कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तिथं आतापर्यंत 99 कोरोनाग्रस्त झाले असून त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 56 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातले ३८ कोरोनाबाधित आज बरे झाले असून आता केवळ ७ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज ५८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ९०० झाली आहे.