नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. काल दिवसभरात अशा एकशे सहा गाड्या सोडल्याचं त्यांनी सांगितलं.

कोल्हापूरहून काल चौदाशे मजूर बिहारला पाठवले असून, कोल्हापूरहून सोडलेली ही तिसरी विशेष रेल्वेगाडी आहे. नाशिक इथून परराज्यातल्या दीड हजार श्रमिकांना लखनऊला पाठवलं आहे.

काल रात्री आठ वाजून १० मिनिटांनी त्यांना घेऊन जाणारी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. नाशिकच्या ग्रामीण भागातल्या मजुरांना घेऊन जाणारी ही चौथी रेल्वे आहे.