नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यात सुरक्षा बंदोबस्तासाठी केंद्र सरकारकडून सशस्त्र पोलीस दलाच्या ९ तुकड्या तैनात होणार आहेत. यात धडक कृतीदलाच्या ४, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २,आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ३ तुकड्यांचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरमधे तैनात असलेल्या १० तुकड्या माघारी बोलावून त्यातल्या ५ महाराष्ट्रात पाठवण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं काढला आहे. बाकीच्या ४ तुकड्या दंगल रोधक पथकातल्या असून त्या मुंबईतल्या तळावरच तैनात आहेत.
राज्यात पोलिसांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० तुकड्या बंदोबस्तासाठी राज्य सरकारनं मागितल्या होत्या.