नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मात्र यात चार एक दिवसांचा फरक पडू शकतो, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.