पुणे : पुणे विभागातून परप्रांतीयांसाठी 17 मे पर्यंत एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -24 उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1, राजस्थानसाठी – 5, बिहारसाठी – 6 व हिमाचल प्रदेशसाठी 1 अशा एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 68 हजार 563 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

18 मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 1, उत्तरप्रदेशसाठी एकुण 3, तसेच तमिळनाडू, बिहार, झारंखड, छत्तीसगड राज्यांसाठी प्रत्येकी 1, अशा एकूण 8 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकुण 10 हजार 955 प्रवासी अपेक्षीत आहेत. यापैकी पुणे स्थानकावरुन उत्तरप्रदेश, तमिळनाडू, बिहार, झारंखड व छत्तीसगड यांच्यासाठी प्रत्येकी एक रेल्वे 6 हजार 984 प्रवाश्यांसह नियोजित आहे. तर सांगली रेल्वे स्थानकावरुन मध्य प्रदेशसाठी 1 हजार 59 प्रवाश्यांसह 1 रेल्वेगाडी नियोजीत आहे. ‍ कोल्हापूर स्थानकावरुन उत्तरप्रदेशसाठी 2 हजार 912 प्रवाशांसह 2 रेल्वेगाडया नियोजित आहेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.