नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान योग्य परवान्याविना दारु वाहून नेणारे 4 ट्रक पोलीसांनी पालघर जिल्ह्यात पकडले. या कारवाईत सुमारे 76 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली असून 5 जणांना अटक केली आहे.

वसई विभागातल्या वालीव पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री गस्त घालताना ही वाहनं आढळल्याचं पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं.