नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातली प्रतिबंधित क्षेत्र आणि त्यापासून २०० मीटरचा  परिसर वगळता उर्वरित भागातल्या मद्यविक्री करणाऱ्या दुकानांमधून  उद्यापासून  घरपोच  मद्यविक्रीसाठी  परवानगी देण्यात आली आहे.

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात  मद्यविक्री करता येईल, तसंच  ही सेवा केवळ घरपोच असून दुकानात मद्यविक्रीवर बंदी राहील.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला.  या आदेशानुसार केवळ वैध परवानाधारकांना  घरपोच मद्य पुरवता येईल, तसंच देशी मद्य घरपोच पुरवण्यावर बंदी राहील.