नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे खरीप हंगामातल्या पेरणीसाठी बियाणं खरेदी करण्यात शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागानं गावोगावी  खतं आणि बियाणं पोहोचवण्याचं नियोजन केलं आहे.

जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी सहाय्यकांना संपर्क करावा आणि  खातं आणि बियाणं खरेदी करावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या २८ शेतकरी गटांनी या योजनेअंतर्गत ६५ मेट्रिक टन खत आणि  १२८ क्विंटल बियाणं खरेदी केलं आहे.