मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, पोलीस दलाचे जवान आदी उपस्थित होते.