नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामं सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजूर काम करत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत. दरम्यान सरकारनं, मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.