नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यापूर्वी आखणी काही काळ जाऊ द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्र सरकारनं येत्या सोमवार पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करायला परवानगी दिली आहे.

मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयाचं नियोजन करायला अजून काही वेळ देणं गरजचेचं आहे, त्यानंतरच विमानसेवा सुरु करावी अशी विनंती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात अगदी अत्यावश्यक कामांसाठीच उद्यापासून शक्य असेल तितक्या कमी प्रमाणात उड्डाणं करावी अशी विनंतीही पुरी यांना केली असल्याचं ते म्हणाले.