नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रनं गेल्या ३ महिन्यांत आपल्या खातेधारकांना २ हजार ७८९ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे.सूक्ष्म,लघू आणि माध्यम उद्योग, स्वयंसहाय्यता गट, कृषी आणि किरकोळ क्षेत्रातल्या एक लाखाहून खातेधारकांचा यात समावेश असल्याचं बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेनं वेबिनार, फोन कॉल , ईमेल , एस एम एस यासारख्या विविध माध्यमांचा उपयोग केल्याचं यात म्हटलं आहे.