नवी दिल्ली : केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या ४७ दिवसांत ११ हजार ५२ कोटी रुपयांचे GST, अर्थात वस्तू आणि सेवा कर परताव्याचे दावे मंजूर केले आहेत. टाळेबंदीच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना रोख रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं अप्रत्यक्ष करमंडळानं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.