नवी दिल्ली : महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर उत्तरप्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उत्तरप्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत पाठवण्यापूर्वी संबंधित राज्यांनी उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याची भूमिका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केली होती. या त्यांच्या या भूमिकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. ही गोष्ट राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवी, तसंच परराज्यातून येणाऱ्या मजुरांची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.