नवी दिल्ली : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, कोरोनामुळे रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा, आता देशभरात, तीन हजार ऐवजी 15 हजार केंद्रांवर होणार आहेत. येत्या एक ते 15 जुलै दरम्यान या परीक्षा होतील अशी माहिती, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नवी दिल्ली इथं दिली. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय, सुरक्षित अंतराचं पालन करण्याच्या दृष्टीनं घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.