सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी १५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच अपंग व्यक्तींकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी ५ टक्के निधी उपलब्ध करण्यात यावा, असे निवेदन माहिती सेवाभावी संस्था (महाराष्ट्र राज्य) मोहोळ तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथ औंदुबर धेडे यांनी मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती तालुका मोहोळ यांना दिले आहे.

तसेच समाजातील गोरगरीब व अपंग नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीचा विचार न झाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे माहिती सेवाभावी संस्था (महाराष्ट्र राज्य) मोहोळ तालुका युवक अध्यक्ष श्री. वैजनाथ धेडे यांनी सांगितले आहे.

या वेळी निवेदन देताना विकास क्षिरसागर सदस्य ग्रामपंचायत कातेवाडी, आदिनाथ पावार, आमार शेख उपस्थित होते.

तसेच या निवेदनाच्या प्रति मा.तहसीलदार अधिकारी मोहोळ व मा.पोलीस निरीक्षक तालुका मोहोळ यांना पाठवण्यात आली आहे.