नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल नागपूर इथं ४६ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात आज उष्णतेची लाट होती. जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश तर कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस इतकं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात तापमापकाचा पारा आज ४६ अंशांवर गेल्यानं वाढत्या उष्म्याचा त्रास प्राण्यांना देखील सहन करावा लागत आहे.
येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.