नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांनी संयुक्तरित्या प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू केली आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही तर राज्य वखार महामंडळाच्या जवळच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीनं तारण कर्ज उपलब्ध व्हावं, यासाठी ही योजना सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

ही योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबवली जात असून, प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही ती सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असं ते म्हणाले.