नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी ९ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यावर रेल्वेने आवाहन केले आहे की प्रवाशांना मुळात प्रकृतीच्या तक्रारी असतील तर या गाड्यांनी प्रवास करताना कोविड१९ च्या प्रसाराचा धोका वाढतो.

अतिताण, मधुमेह, हृदयविकार किंवा कर्करोग असे आजार असलेल्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांनी तसेच १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी तसेच गरोदर महिलांनी या गाड्यांनी प्रवास करणे टाळावे असे रेल्वेच्या पत्रकात म्हटले आहे.