नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा इथे पाच लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर योजनेला मोठं बळ मिळणार आहे.हा प्रकल्प रशियाच्या सहकार्यानं होणार असून त्यामुळे संरक्षण क्षेत्रातले भारत-रशिया संबंध अधिक दृढ होणार आहेत. या योजनेमुळे देशातल्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगातल्या कंपन्यांना लाभ होणार असून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. ३०० मीटर माऱ्याची क्षमता असलेली AK-203 रायफल वजनानं हलकी, परिणामकारक आणि आधुनिक तंत्रानंयुक्त असून भारतीय लष्कराचं बळ त्यामुळे वाढणार आहे.